!!!अप्रतिम कविता !!! (संकलित)
मैत्री
अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच
अचानक एकमेकांची सवय होवून जाणं
म्हणजे.... मैत्री...
तुमच्या सारखी खूप खूप गुणी...
अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी....
जशी कायम बहरलेली सदाफुली...
म्हणजे मैत्री...!!
हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा..
म्हणजे.... मैत्री....
मनात निर्माण झालेला तुमच्या आठवणींचा कप्पा...
म्हणजे.... मैत्री...!!
मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन्
तुमच्याशी बोलताना विसर पडलेला शीण
म्हणजे.... मैत्री...!
अगदीच महागडं सुंदर फुलझाड नसेलही पण दुर्मिळ
गवताचं एक नाजुक पातं...
म्हणजे.... मैत्री....
देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजावं असं पवित्र नातं
म्हणजे.... मैत्री...!!
उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान
आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहावं
असं पान....
म्हणजे.... मैत्री...!!
हसता हसता अलगद टीपावं असं डोळ्यातलं पाणी..
अन्...
स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची
अशी ही कहाणी...
म्हणजे....
मैत्री.......
मैत्री....
चालता चालता अलगद हात हाती यावा ...
हसण्यात अश्रू विरून जावा
अशी मैत्री असावी.
मनमोकळेपणाने बोलता यावं,
वेळेचंही भान नसावं
अशी मैत्री असावी.
थकल्यानंतर झाडाखाली बसावं
अन् ...
न सांगताही मनातलं ओळखावं ...
अशी मैत्री असावी.
दोन घडी भेट झाली नाही
तर चुटपुट लागावी....
भेटल्यावर मात्र भडाभडा बोलावं...
अशी छान मैत्री असावी.
एकाचं दु:ख दुसर्याला कळावं
अन्
आठवण होताच हलकं स्मित झळकावं
अशी मैत्री असावी.
न रुसवा, ना अबोला,
ना ईर्षा, ना बढाया,
ना भूलथापा, ना अविश्वास,
फक्त आनंदच वाटावा...
मैत्री अशी असावी...
"मन"
शब्द तुझे
शब्द माझे
कमी करतात
मनाचे ओझे.
शब्द तोलावेत
शब्द मोलावेत
बोलतानाही
जपून वापरावेत.
शब्द तोडतात
शब्द जोडतात
माणुसकीला जिवंत
शब्दच ठेवतात.
शब्द हसवतात
शब्द रडवतात
डोळ्यातील अश्रूही
शब्दच पुसतात.
शब्द हरवतात
शब्द जिंकवतात
जगण्याची उमेद
शब्दच देतात.
शब्द आपलेपणा
शब्द परकेपणा
जिवंत ठेवतात
शब्दच नात्यांना.
शब्द मान
शब्द अपमान
मिळवून देतात
शब्दच सन्मान.
शब्द देतात
शब्द घेतात
एकमेकांतील विश्वास
शब्दच वाढवतात.
शब्द बोलतात
शब्द डोलतात
मनातली गुपितं
शब्दच खोलतात.
शब्द तारतात
शब्द मारतात
आयुष्यातूनही
शब्दच उठवतात.
शब्द घडवतात
शब्द बिघडवतात
यशाच्या शिखरावर
शब्दच पोहोचवतात.
शब्द उच्चार
शब्द स्पष्टता
शब्दातूनच कळते
माणसाची योग्यता.
शब्द प्रश्न
शब्द उत्तर
शब्दांविना
सारेच निरुत्तर.
शब्द ज्ञान
शब्द अज्ञान
शब्दातूनच
खुलते विज्ञान.
शब्द फळा
शब्द शाळा
शब्दांनीच फुलतो
ज्ञानाचा मळा.
शब्द धार
शब्द भार
मित्रांसाठी
शब्दच आधार.
शब्द गंध
शब्द धुंद
शब्दानेच होते
मन बेधुंद.
शब्द ध्यास
शब्द श्वास
खऱ्या प्रेमाचा
शब्दच विश्वास.
शब्द भाव
शब्द भावना
व्यक्त करतात
मनोकामना.
शब्द गीता
शब्द कुराण
भारतीय एकतेचे
शब्दच प्रमाण.
शब्द शाबासकी
शब्द प्रेरणा
शब्दच खुलवतात
कवीच्या मना...!!!
.....✍️ गजेंद्र भालके.
म्हातारपण
60+
म्हातारपणाला नाव छान
कोणी म्हणत संन्यासाश्रम
कोणी म्हणतं वानप्रस्थाश्रम
मी म्हणतो आनंदाश्रम....
म्हातारपणात कसं राहायचं
घरात असेल तर आश्रमासारखं
आश्रमात असेल तर
घरासारखं...
कशातच कुठे गुंतायचं नसतं
जुन्या आठवणी काढायच्या नाही
"आमच्या वेळी" म्हणायचं नाही
अपमान झाला समजायचं नाही
उगाच लांबन लावायचे नाही...
सुखाची भट्टी जमवत जायच
साऱ्यांशी दोस्ती जुळवत राहायचं
राग लोभाला लांब पळवायचं
आनंद सारखा वाटत जायचं...
म्हातारपण सुद्धा छान असतं
लेन्स इम्प्लांट ने स्वच्छ दिसतं
नव्या दातांनी सहज चावता येतं
कान यंत्राने ऐकु येतं...
पार्कात जाऊन फिरुन यावं
क्लबात जाऊन पत्ते कुटावं
देवळात जाऊन भजन करावं
टी.व्ही. मधल्या सिरियल बघावं
मुलांसमोर गप्प बसावं
नातवंडांशी खेळत रहावं
बायकोबरोबर भांडत जावं
मित्रांबरोबर बोलत सुटावं...
जमेल तेंव्हा टूर वर जावं
बायकोच लगेज सोबत न्यावं
दिलखुलास फिरून घ्यावं
थकलं तिथेच बसून राहावं
लायन रोटरी अटेण्ड करावं
वेळ असेल तर गाण गावं
एकांतात ठेक्यावर नाचुन घ्यावं
पाहिल कुणी व्यायाम म्हणावं...
कंटाळा आला झोपुन जावं
जाग आली फेसबुक बघावं
बघता बघता घोरत राहावं
टोकल कोणी वाटसाप उघडाव...
एकटं घरी किचन पहावं
दुधाची साय गायब करावं
मुलांचा खाऊ टेस्ट करावं
आलं मनात गोडाचं खावं...
जुना शर्ट घालत राहावं
थोडे केस सावरत राहावं
आरशालाच बोगस म्हणावं
कोणी नसलं तर वाकुली करावं...
छान रंगवावी सुरांची मैफल
मस्त जमवावी जेवणाची पंगत
सुरेल जुळवावी गप्पांची संगत
लुटत रहावी जगण्याची गम्मत...
स्वाद घेत, दाद देत
तृप्त मनानं आनंद घेत
हळुच आपण असं निघुन जावं
जसं पिकलं पान गळुन पडावं
जगता आलं पाहिजे.
मरता केव्हाही येतं,
पण जगता आलं पाहिजे.
सुख भोगता केव्हाही येतं,
पण दुःख पचवता आलं पाहिजे.
रंग सावळा म्हणून काय झालं,
कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे.
रंग गोरा असला म्हणून काय झालं,
मनावरील काजळी काढता आली पाहिजे.
यशानं माणूस उंच जातो,
पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे.
समाधान मानून,
आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.
पाप काय कसंही करता येतं,
पण पुण्य करता आलं पाहिजे.
ताठ काय कोणीही राहतं,
पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.
ठेच जीवनात लागतेच,
सहन करता आली पाहिजे.
मलमपट्टी करून तिला,
पुन्हा चालता आलं पाहिजे.
शहाण्याचं सोंग घेऊन,
वेडं होता आलं पाहिजे.
कशाला बळी न पडता,
आनंदी जगता आलं पाहिजे.
जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,
ती उणीव भरता आली पाहिजे.
हास्य आणि अश्रूचा मिलाफ करून.
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे...!!
----------------------------------------------------------------------------
विवाहित पुरूषांचे कधीही प्रगट न होणारे अंतर्मन सुंदर शब्दांत गुंफलेले एक सुंदर काव्य. प्रत्येक विवाहित स्त्रीने आणि शक्य झाल्यास त्याच्या मुला / मुलींनी देखील जरूर वाचावे.
||आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा ||
नवरा म्हणजे समुद्राचा
भरभक्कम काठ
संसारात उभा राहतो
पाय रोवून ताठ ll
कितीही येवो प्रपंचात
दुःखाच्या लाटा
तो मात्र शोधीत राहतो
सुखाच्या वाटा ll
सर्वांच्या कल्याणा करता
पोटतिडकीने बोलत राहतो
न पेलणारं ओझं सुद्धा
डोक्यावर घेऊन चालत राहतो ll
कधी कधी बायकोलाही
त्याचं दुःख कळत नसतं
आतल्या आत त्याचं मन
मशाली सारखं जळत असतं ll
नवरा आपल्या दुःखाचं
कधीच प्रदर्शन मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटतं
पण कुणाला सांगत नाही ll
बायकोचं मन हळवं आहे
याची नवऱ्याला जाणीव असते
दुःख समजून न घेण्याची
अनेक बायकात उणीव असते ll
सारं काही कळत असून
नवऱ्याला अपमान गिळावे लागतात
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात ll
सगळ्यांच्या आवडी जपता जपता
मन मारीत जगत असतो
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो ll
*दोन शब्द जगण्याविषयी*
कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये
चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये
कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये
नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये
गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये
जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये
सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये
नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये
हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.
*कारण*
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... *माणसं !*
संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... *माणसं !*
वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... *माणसं !*
पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... *माणसं !*
शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... *माणसं !*
दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... *माणसं !*
नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी
*सारी असतात आपलीच माणसं !
!!! भाग्यवंत मी शिक्षक !!!
देवा फार छान केलंस ....................
मला शिक्षक बनवलंस ..........म्हणून !
डॉक्टर बनवले असते तर ................
नाराज चेहरे पाहावे लागले असते .
इंजिनिअर बनवले असते तर .............
दिवसभर निर्जीव यंत्र पाहावे लागले असते .
वकील बनवले असते तर ...................
इच्छा नसतांना बोलावे लागले असते .
बँक अधिकारी बनवले असते तर .........
दुसऱ्यांचे सांभाळत बसावे लागले असते .
नेता बनवले असते तर ...... नाईलाजाने
सगळ्यांची मने धरावी लागली असती .
🌹👏 विद्यार्थी म्हणजे देव कसा असतो
याचे साक्षात रूप ...निर्मळ हास्य
व evergreen Garden !
देवा तू माझी किती काळजी घेतलीस
हे मला आत्ता कळलं
रोज विद्यार्थी रूपाने तुझे अनंत
रूप दाखवतोस
दिवसभर माझ्याशी हसतोस ,बोलतोस
खरंच मी किती भाग्यवान.... ................
कि दररोज तुझी भेट होते .
साधुसंत किती जप-तप करतात?
तरी तू त्यांना रोज भेटत नाहीस .
या जन्मी तुला रोज भेटण्याची...................
सेवा दिल्या बद्दल किती आभार मानू .
म्हणून तर मोठमोठे नेते देखील
लहान मुलांना भेटून आनंदी होतात.
देवा..... तुझे आभार मानायला ................
माझ्या जवळ शब्दच नाहीत .
🌹👏👍 --- देवा फार छान केलंस .........
मला शिक्षक बनवलंस !
!!! जगण्यातली मजा !!!
पटलं तर असे वागा
1)जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा
अहंकार जर असेल तर
खरंच लवकर सोडा
2)जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल
गप्पा च्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल
3)महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे
पक्वान्नाची गरजच नाही
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे
4)ठेचा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही
मग बघा चार घास
जास्तीचे जातात का नाही
5)सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे
सगळ्यांच चांगलं होऊ दे
असं देवाला म्हटलं पाहिजे
6)एखाद्या दिवशी सर्वांनी
सिनेमा पहावा मिळून
रहात जावं सर्वांशी
नेहमी हसून खेळून
7)काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं
बैठकीत सतरंजीवर
गप्पा मारीत बसावं
8)नवरा बायको दोन लेकरात
" दिवाळ सण " असतो का ?
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का ?
9)साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो
चार पाहुणे आल्यावरच
आकाश कंदील हासतो
10)सुख वास्तुत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे
घराच्या उंबर्ठ्यालाही
पायांचा स्पर्श पाहिजे
11)दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं
जुने दिवस आठवताना
पुन्हा लहान व्हावं
12)वर्षातून एखादी दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी
" त्यांचं आमचं पटत नाही "
ही ओळ खोडावी
13)आयुष्य खूप छोटं आहे
लवकर लवकर भेटून घ्या
काही धरा काही सोडा
सगळे वाद मिटवून घ्या
14)पटलं तरच पुढे पाठवा
तसेच आपल्या ह्रदयातही साठवां
अपल्या चार माणसांसाठी
थोडं रक्त आटवा...
खूप छान कविता आहे सर
ReplyDeleteधन्यवाद सर........
Delete