1. तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणा-या बंदिस्त आकृतीला ............. असे म्हणतात.
2. खालीलपैकी त्रिकोणाचे घटक कोणते ?
3. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात,त्या त्रिकोणाला ............. असे म्हणतात.
4. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात,त्या त्रिकोणाला ............. असे म्हणतात.
5. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात,त्या त्रिकोणाला ............. असे म्हणतात.
6 ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात,त्या त्रिकोणाला ............. असे म्हणतात.
7. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, त्या त्रिकोणाला ............. असे म्हणतात.
8. ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो, त्या त्रिकोणाला ............. असे म्हणतात.
9. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज ............ असते.
10. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिस-या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी ............ असते.
No comments:
Post a Comment